Skip to product information
1 of 2

Payal Books

Scream For Me By Karen Rose Translated By Deepak Kulkarni

Regular price Rs. 432.00
Regular price Rs. 480.00 Sale price Rs. 432.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आपल्या प्रत्येक लोकप्रिय कादंबरीतून,वाचकांच्या अंगावर काटा उभा करत, आपण सस्पेन्स कादंबरीची सम्राज्ञी आहोत हे करेन रोझ ह्या प्रतिभासंपन्न लेखिकेने आता निर्विवादपणे सिद्ध केले आहे. ‘डाय फॉर मी’ या गाजलेल्या कादंबरीची ही लेखिका आता आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारे कथानक घेऊन, वाचकांच्या समोर येत आहे. एका छोट्याशा गावात अचानक एक भयप्रद खूनसत्र सुरू होतं. गाव पार हादरून जातं. आपल्या कामात निष्णात असणारा एक धाडसी गुप्तचर अधिकारी आणि एक पिसाट, विकृत खुनी ह्यांची आमने-सामने टक्कर होते. मरणाच्या दारात उभ्या केलेल्या आपल्या सावजाला, तो विकृत खुनी वेडावत म्हणतो, ‘‘तुला जेव्हा वेदना असह्य होतील ना, तेव्हा माझ्या नावाने एक किंकाळी फोड.’’ स्पेशल एजंट डॅनियल व्हार्टानियन हा, तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या एका खुनाची सहीसही नक्कल करणाऱ्या त्या खुन्याला शोधून काढण्याचा विडा उचलतो. नुकताच मारला गेलेल्या आपल्या कुविख्यात खुनी भावाजवळ सापडलेली काही छायाचित्रं, हाच डॅनियलपाशी एकमेव धागा असतो. खुनी इसमाचा शोध घेण्याच्या त्या विलक्षण प्रवासात, त्याला आपल्याच कुटुंबाच्या काळ्याकुट्ट इतिहासाचे दर्शन घडते आणि त्याचबरोबर मानवी अभद्र मनाच्या गूढडोहाचा तळही सापडतो. ह्याच प्रवासात, अ‍ॅलेक्स पॅलन ह्या एका सुंदर परिचारिकेची त्याची भेट होते. तिची कहाणी ऐकून, त्याला आपलाच भूतकाळ आठवतो. विशेष म्हणजे अ‍ॅलेक्सचा चेहरा आणि तेरा वर्षांपूर्वी खून झालेल्या त्या मुलीच्या चेहऱ्यात कमालीचे साधम्र्य असते. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ह्या प्रकरणात गुंतलेल्या आहेत. त्या विकृत खुनी इसमांच्या यादीत अ‍ॅलेक्सचेही नाव आहे, हे डॅनियलला समजते. दिवसागणिक बळी जाणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढू लागते. आता डॅनियलपाशी फारच थोडा अवधी राहिलेला असतो. त्या क्रूरकर्म्याला लवकरात लवकर शोधणं जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचं असतं, अ‍ॅलेक्सचा जीव वाचवणं. कारण तो आता अ‍ॅलेक्सच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो.