Payal Books
Savarkar Part 2 by Vikram Sampat सावरकर खंड 2
Couldn't load pickup availability
Savarkar Part 2 by Vikram Sampat सावरकर खंड 2
सावरकर : एक वादग्रस्त वारसा (1924-1966)
सावरकरांच्या मृत्यूनंतरही आज अनेक दशके भारताच्या राजकीय पटलावर त्यांचा अलौकिक प्रभाव टिकून आहे. 1857चे स्वातंत्र्यसमर या त्यांच्या ग्रंथातील हिंदू–मुस्लीम एकतेचा आशावादी पुरस्कर्ता यापासून ते सेल्युलर कारागृहातील हिंदुत्वाचा समर्थक हा त्यांच्या भूमिकेतील बदल का झाला? अखिल भारतीय हिंदूमहासभेचे भूतपूर्व अध्यक्ष असलेले सावरकर हे काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचे प्रबळ टीकाकार होते. गांधींच्या हत्येनंतर सावरकरांवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचे आरोप ठेवण्यात आले. न्यायालयाने वेळोवेळी त्यांना निर्दोष मुक्त करूनही अनेकदा गांधीहत्येमधील कथित भूमिकेबद्दल सावरकर चर्चा आणि वादविवादांच्या केंद्रस्थानी असतात.
सावरकर खरोखरच गांधीहत्येत सहभागी होते का? गांधींच्या हत्येनंतर विशिष्ट समुदायाचा वंशसंहार झाला होता का? संपूर्ण भारतातील आणि परदेशातील इंग्रजी आणि अनेक भारतीय भाषांतील अभिलेखागारांतील मूळ कागदपत्रांच्या विस्तृत संशोधनावर आधारित पुस्तकाच्या या शेवटच्या खंडात इतिहासकार विक्रम संपत यांनी विसाव्या शतकातील सर्वाधिक विवादास्पद राजकीय विचारवंत आणि नेते विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन व कार्य प्रकाशात आणले आहे.

