Savalya Chahulicha Zeema By Mahavir Jondhale
‘जीव कर्ता, भोक्ता व ज्ञाता असतो,’ अशा कर्त्या जीवाला भक्तीभावाचा भोक्ता आणि ज्ञाता करून ज्ञानेश्वरांनी चैतन्याची सावळी चाहूल माणसाच्या अनुभवाच्या कक्षेत
‘सावळ्या चाहुलीचा झिम्मा’, ‘खारीचा वाटा’ आणि ‘चांदण्याचा रस्ता’ या तीनही ललित गद्यलेखनातील निसर्गभान विलक्षण आहे. पण मग पुन्हा ज्येष्ठ समीक्षक चंद्रशेखर जहागीरदार यांनी म्हटल्याप्रमाणे, ललित गद्यातील निसर्गभानाची अनुभूती म्हणजे गतकालीन जीवनाबद्दलची कधी न संपणारी ओढ -
चित्रकार श्रीधर अंभोरे यांची रेखाचित्रे सावळी चाहुल, दृष्टीचा, दर्शनाचा मूर्त विषय असल्याचे दर्शवितात. पुस्तकाच्या आशयसौंदर्यात आणि वाचकाच्या जाणीव सौंदर्यामध्ये ही रेखाटने अधिक भर घालतात.
‘आपुला ठावो न सांडिता, आलिंगिये चंद्र प्रकटता.’ यातील भावार्थ या रेखाटनांमुळे बोलका होऊन वाचकांच्या अधिक जवळ जातो.
- रूपाली शंदे