सुमारे १३.७ अब्ज वर्षांपूर्वी एका बिंदूमध्ये महाप्रचंड स्फोट झाला व विश्वाची निर्मिती झाली असे मानले जाते. आदिमानव ते शहाणा मानव हा उत्क्रांत काळ दीड-दोन लाख वर्षांचा असावा. त्यात, भाषा, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती ह्यांची वाढ झाली. आर्य लोक हे मूळचे भारताचे की बाहेरचे? ऋग्वेदाची रचना, दाशराज्ञ युद्ध, सिंधु संस्कृती केव्हा व कशी निर्माण झाली? सतीने दक्षाच्या यज्ञात स्वत:ची आहुती का दिली अशी अनेक कोडी या ग्रंथात अत्यंत रंजक पद्धतीने सोडविली आहेत. पौराणिक परंपरेनुसार सत्ययुग १७,२८,००० वर्षांचे मानले जाते. सत्ययुगाचा अंत सतीने केलेल्या आत्मदहनामुळे झाला असे प्रतिपादित केले जाते. श्री. अनिल शिंदे यांनी लिहिलेल्या ग्रंथात सत्ययुगाचे सिंधु संस्कृतीच्या उत्खननातून प्राप्त झालेले पुरावे, वेद पुराणातील कथा ह्यांच्या आधारे ऐतिहासिक कथानकाच्या रूपाने मांडले आहे.
Satyayug by Anita shinde
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per