Skip to product information
1 of 2

Payal Books

Sarwansathi Arogya? Hoy, Shakya Aahe By Dr. Anant Phadke

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

भारतात अजूनही कोट्यवधी लोक चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. हे आजचे चित्र बदलून ‘सर्व जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा देणे शक्य आहे’ असे साधार मांडणारे हे पुस्तक आहे.

सरकारच्या औषध-धोरणातील चुका सुधारून ‘सर्वांसाठी औषधे’ हे ध्येय गाठणे कसे शक्य आहे, हे सुरुवातीच्या प्रकरणात मांडले आहे. सरकारी दवाखाने, रुग्णालये इथे सर्व आवश्यक औषधे मोफत देणे, तसेच औषध दुकानांतील किमती सध्याच्या एकचतुर्थांश करणे कसे शक्य आहे, याचा उलगडा ही मांडणी करताना केला आहे.

खाजगी वैद्यकीय सेवेत कोणते गंभीर दोष आहेत; ‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’ या ध्येयाच्या ते कसे आड येतात; इतर अनेक देशांप्रमाणे भारतातही ‘प्रमाणित सेवेसाठी प्रमाणित दर’ या तत्त्वानुसार सरकारने गरजेप्रमाणे खाजगी सेवा विकत घेणे हा त्यावर उपाय कसा आहे, हे मधल्या प्रकरणात आहे.  

‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’ हे ध्येय गाठण्यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवेत कोणत्या आमूलाग्र सुधारणा करायला हव्यात याची चर्चा शेवटच्या प्रकरणात केली आहे.

सखोल अभ्यास  ‘जन आरोग्य चळवळी’तील प्रदीर्घ अनुभव यांच्या आधारे लिहिलेले हे पुस्तक वाचकाला बरेच काही देऊन जाईल.

सर्वांसाठी आरोग्य ? होय, शक्य आहे ! - डॉ. अनंत फडके