Payal Books
Sarvasparshi Dr. Babasaheb by Sakal
Couldn't load pickup availability
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी होते. धर्म, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा अशा अनेक विषयांत ते कसे निष्णात होते. याचे विश्लेषण करणाऱ्या लेखांचा एकत्र संग्रह म्हणजे 'सर्वस्पर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर...' हे पुस्तक!
आपला देश 'राष्ट्र' म्हणून कधी उदयाला आला; इथपासून ते भारतीय राष्ट्रवादापर्यंत चर्चा, नेहमी झडत असतात. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब यांची 'राष्ट्रकल्पना' आजही महत्त्वाची ठरत आहे. ती कशी याचे विस्तृत मांडणी!
डॉ. बाबासाहेब लोकशाहीचे कडवे पुरस्कर्ते कसे होते, त्यांची ‘राष्ट्रकल्पना’ काय होती, बाबासाहेबांचे बुद्ध-धम्माविषयीचे तत्त्वज्ञान, भारतीय रुपया, चलननिर्मिती आणि भाववाढ या आर्थिक प्रश्नांबाबत त्यांनी मांडलेले विचार, त्यांचे स्त्रीविषयक विचार आणि कार्य, शेती आणि पाण्याचा प्रश्न असा विविध विषयांवर तज्ज्ञ लेखकांनी त्यांच्यातील संशोधकीय कौशल्याने केलेली मांडणी!
प्रा. देवेंद्र इंगळे, जनार्दन वाघमारे, डॉ. गंगाधर पानतावणे डॉ. बी. ए चोपडे, डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. प्रा. गौतम कांबळे, प्रा. सुशीला मूल-जाधव, प्रा. रविचंद्र हडसनकर, बी. व्ही. जोंधळे, डॉ. आदिनाथ इंगोले, प्रा. केशव देशमुख, भीमराव सरवदे, श्रीमंत कोकाटे, ॲड. राज कुलकर्णी, रमेश पांडव, ताराचंद खांडेकर, प्रा. सविता कांबळे, प्रा. स्वाती काटे, पद्माकर उखळीकर यांसह विविध तज्ज्ञ लेखकांच्या लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाच्या पुढे जाऊन घेतलेल्या निर्णयांची एकत्रित मांडणी आणि विविध तज्ज्ञ लेखकांनी त्यांचे केलेले मार्मिक विश्लेषण हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.
सहभागी लेखक : पुस्तकात प्रा. देवेंद्र इंगळे, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. सुधीर गव्हाणे, प्रा. बाबा गाडे, प्रा. रविचंद्र हडसनकर, बी. व्ही. जोंधळे, प्रा. बी. ए. चोपडे, प्रा. केशव देशमुख, ताराचंद्र खांडेकर, डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रा. डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रदीप आगलावे, भीमराव सरवदे, डॉ. आदिनाथ इंगोले, प्रा. स्वाती काटे, प्रा. सविता सुमेध कांबळे, प्रा. सुशीला मूल-जाधव, राज कुलकर्णी, श्रीमंत कोकाटे, रमेश पांडव, पद्माकर उखळीकर या विशेषतज्ज्ञांचे लेख समाविष्ट केले आहेत.
