Skip to product information
1 of 2

Payal Books

Sarkari Davakhana By Dr. Prakash Suryakant Koyade सरकारी दवाखाना

Regular price Rs. 374.00
Regular price Rs. 440.00 Sale price Rs. 374.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Sarkari Davakhana By Dr. Prakash Suryakant Koyade सरकारी दवाखाना

थरारक कादंबरी!
यापूर्वी सरांची प्रतिपश्चंद्र कादंबरी प्रचंड गाजली होती.

(एक विनंती: चुकूनही कादंबरीचं शेवटचं पान आधीच वाचू नका ) सरकारी दवाखाने म्हणजे रुग्णांच्या कचराकुंड्या! जेव्हा रुग्णासाठी पैसा संपतो, सोनं गहाण ठेवलं जातं कधीकधी जमीन विकावी लागते तेव्हा सरकारी दवाखान्याची पायरी दिसू लागते आणि एक प्रवास सुरू होतो... मृत्यूची वाट बघण्याचा! अपघात विभागात घडणाऱ्या घटना, आयसीयूमधील आपल्या व्यक्तीचा मृत्यू, शेवटच्या क्षणी होणारी नातेवाईकांची घालमेल, पोस्टमार्टम करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य, डॉक्टर लोकांचं व्यवसायिक आणि खाजगी जीवन, डिलिव्हरी वार्ड! सगळंच वाईट नाही... काही चांगल्याही गोष्टी! सरकारी दवाखान्यातील लावारिस लोक, गर्दी, तिथला वास, कचराकुंडीत नाळेसहीत सापडलेलं बाळ, छातीवर 'मृत्यू' अशा नावाचा टॅटू काढणारा कर्मचारी, म्हाताऱ्यांची प्रेम कहानी, स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचं व्हेंटिलेटर बंद करणारा बाप... काय नाही या कादंबरीत! हे सगळं सुरू असतानाच घडणारा वेगवान घटनाक्रम आणि दवाखान्याच्या चार भिंतींच्या नकळत घडणारे एक युद्ध! सस्पेन्स थ्रिलरने भरलेला एक फार मोठा गुन्हा... आणि त्याची उकल! ही कादंबरी तुम्हाला जगण्याची आशा देईल, नात्यांचं महत्त्व देईल, माणसाची किंमत देईल... हसणं देईल, रडणं देईल! ही कादंबरी तुम्हाला तुमच्या एकातरी माणसाची आठवण नक्कीच करून देईल... प्रतिपश्चंद्र आणि केदारनाथ १७जून या दोन पुस्तकांच्या बेचाळीस हजार पुस्तकांच्या यशानंतर डॉ. प्रकाश कोयाडे यांची ही तिसरी कादंबरी...
     कादंबरी: सरकारी दवाखाना 
     लेखक: डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)