Payal Book
Sare Tuzyachsathi-सारे तुझ्याच साठी
Regular price
Rs. 245.00
Regular price
Rs. 275.00
Sale price
Rs. 245.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सारे तुझ्याचसाठी या नाटकामध्ये सरोगसी ह्या विषयावर प्रकाश टाकलेला आहे. सरोगसीमध्ये गर्भाशय भाड्याने देणे व घेणे, तसेच ते देणाऱ्या महिलांचे शोषण यांसंदर्भात सातत्याने चर्चा होतात. ह्यामध्ये अनेक कायदेशीर, नैतिक आणि सामाजिक पेच आहेत. कायद्यानुसार हा केवळ एक करार असतो. तर त्यानुसार, जन्मदात्री माता उत्पादक आणि मूल स्वीकारणारी ग्राहक, असे म्हणावे काय? नैसर्गिकरीत्या बाळाला जन्म देणारी माताच मातृत्वाच्या निकषावर खरी ठरते, ही मानसिकता समाजामध्ये आजही आहे. ह्या दबावामुळे सरोगसीसाठी पैसे देऊन मूल प्राप्त करण्याची अगतिकता असते. मातृत्व, वंध्यत्वाच्या प्रश्नांशी असंख्य वेगळे प्रश्न जोडलेले आहेत. ह्या प्रक्रियेत प्रतिकूलतेत आव्हान स्वीकारण्याची होड लागते. नायिकेला आपले मूल दुसऱ्या स्त्रीच्या उदरातून जन्मलेले आहे हा सल आणि जन्मदात्री मातेच्या मनाची घालमेल, तसेच दोघींच्याही मनातल्या भावनांचा गोंधळ, ह्या पुस्तकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे

