Saraswatichya Sanidhyat |सरस्वतीच्या सान्निध्यात Author: Dr. V. D. Kulkarni |डॉ. व. दि. कुलकर्णी
कै. व. दि. कुलकर्णी यांनी 1962 ते 1998 या कालखंडात काही निमित्ताने आणि काही निमित्ताशिवाय लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा हा संग्रह आहे. ह्या लेखांतून सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या कर्तृत्त्ववान गुणीजनांचा परिचय होतो; त्यांच्या कर्मशीलतेची ओळख होते आणि ते सारे आपल्या अगदी जवळचेच आहेत असे वाटू लागते. या सर्व लेखांच्या वेगळेपणामुळे वाचकांचे उन्नयन होते, कारण वदिंची जीवनोत्सुक रसिकाची, सहृदय समीक्षकाची मर्मग्रही चिंतकाची दृष्टी या लेखांमागे आहे. सरस्वतीच्या सान्निध्यात राहण्याचे आनंददायी भाग्य वदिंना लाभले; त्यांच्या ह्या साहित्यकृतीमुळे वाचकालाही असा अनुभव प्रत्ययास येईल. पुन्हा पुन्हा वाचावे असे हे पुस्तक आहे.