Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Sanvidhan Bhan By Shriranjan Aavate संविधान भान श्रीरंजन आवटे

Regular price Rs. 690.00
Regular price Rs. 925.00 Sale price Rs. 690.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Sanvidhan Bhan By Shriranjan Aavate संविधान भान  श्रीरंजन आवटे

संविधानकर्त्यांचे शपथपत्र होते मानवी मूल्यांसाठी. नेहरुंनी सांगितलेल्या नियतीच्या काव्यात्म करारासाठी. गांधींच्या ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’ म्हणणा−या भारतासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समताधिष्ठित समाजासाठी. ताठ मानेने जगता येईल, अशा टागोरांच्या भीतीशून्य समाजासाठी. साने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म सांगणा−या बलशाली भारतासाठी. दाक्षायणी वेलायुधनच्या गावकुसाबाहेरच्या आभाळासाठी. जयपालसिंग मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या ‘उलगुलान’साठी. मौलाना आझादांच्या ‘गंगा जमनी तहजीब’ सांगत शिक्षणाची कास धरणा−या इंद्रधनुषी भारतासाठी. सावित्रीबाईंच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी. बुद्धाच्या पिंपळासाठी. माणसातला ईश्वर जागवणा−या गुरु नानकांसाठी. खुल्या दिलानं माफ करणा−या येशूसाठी. बाजाराच्या मधोमध उभं राहून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणा−या कबीरासाठी. संत रवीदासांच्या बेगमपु−यासाठी. तुकोबाची गाथा तारणा−या इंद्रायणीसाठी आणि चेतना चिंतामणीच्या गावाचा रस्ता सांगणा−या ज्ञानोबासाठी. या शपथपत्राला जागण्यासाठीचा हा जेंटल रिमांइडर !