Santaji by Kaka Vidhate संताजी काका विधाते
मराठेशाहीच्या इतिहासात काही पराक्रमी, धाडसी, शूर वीरांची नावे सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशी आहेत. त्यातील एक नांव म्हणजे सेनापती संताजी घोरपडे. संताजी यांच्याविषयी संशोधन करून त्यांच्या जीवनावर काका विधाते यांनी चरित्रवजा कादंबरी लिहिली आहे. संताजी म्हणजे पराक्रम, संताजी म्हणजे युद्धकौशल्य. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे संपले असे औरंगजेबाला वाटले होते. पण त्याचा तो आनंद अल्पकाळ टिकला. कारण संताजी घोरपडे यांच्या रुपाने मराठेशाहीला एक लखलखता हिरा गवसला होता. संताजींनी मोगलांना धूळ चारली. जीवावरचा धुकं पत्करूनअतुलनीय पराक्रम गाजवला. परकीयांच्या हाती सत्ता लागू नये म्हणून सर्व ताकदीनिशी झुंज दिली. त्या संताजींची ही रसाळ कथा.