Payal Books
Sanskrut Sahityashi Tondolakh | संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख Author: Dr. Saroj Deshpande |डॉ. सरोज देशपांडे
Couldn't load pickup availability
डॉ. सरोज देशपांडे यांनी अनेक वर्ष पुणे विद्यापीठातील ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा’त संशोधनाचे व अध्यापनाचे काम केलेले आहे. गेले काही वर्षे त्याच विद्यापीठाला संलग्न असणार्या ‘ललितकलाकेंद्रा’तील संगीत, नृत्य, नाट्य विभागातील विद्यार्थ्यांना संस्कृत परंपरेचा परिचय करून देण्याचे आणि नाट्यशास्त्र शिकविण्याचे कार्य त्या करीत आहेत. त्यामुळे एका अर्थाने भिन्न भिन्न स्तरांवरील विद्यार्थ्यांच्या गरजा त्यांच्या मनात असणार. परंतु म्हणून हे पुस्तक क्रमिक पाठ्यपुस्तकासारखे लिहिणे त्यांच्या मनात नसावे. कारण या लेखनामागचा हेतू सुलभीकरणाचा नसून, संस्कृत ग्रंथातील मांडणी, त्यामागचा तात्त्विक विचार पारदर्शकपणे सादर करण्याचा आहे. - पुष्पा भावे
