Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Sanskritichya Prandhara By Varsha Gajendragadkar संस्कृतीच्या प्राणधारा संपादन : वर्षा गजेंद्रगडकर

Regular price Rs. 430.00
Regular price Rs. 480.00 Sale price Rs. 430.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sanskritichya Prandhara By Varsha Gajendragadkar संस्कृतीच्या प्राणधारा  संपादन : वर्षा गजेंद्रगडकर 

माणसाला पाण्याचे आकर्षण आहे. माणूस पाण्यातून आला आहे. तो 'जलज' आहे एका अर्थाने. म्हणून जीवन आणि संस्कृती पाण्याच्या सान्निध्याने वाढली. नाईल, अमेझॉन, यांग त्से, मिसिसिपी, भारतातील गंगा, महाराष्ट्रातील गोदावरी ही याची काही उदाहरणे. यांच्या काठी संस्कृती वसली, स्थिरावली व विस्तारलेली आहे. वाराणसी एक प्राचीन 'संस्कृती शहर' म्हणून पटकन आपल्याला आठवते. नदी प्राणवाहिनी आहे, याचे भान जगभरातल्या सर्व अभ्यासकांनी ठेवलेले आहे आणि म्हणून नदीचा शोध घेण्याचे काम ठिकठिकाणी अव्याहतपणे सुरू असल्याचे आपल्याला दिसते. अभ्यासकांच्या दृष्टीने अभ्यासाच्या पद्धती वेगवेगळ्या असतील. माझ्या अल्प आकलनानुसार ढोबळमानाने दोन पद्धती विकसित होताना आपल्याला दिसतात. एक पद्धत अशी आहे की, पुराणोक्त नद्यांची व्युत्पत्ती, नदीविषयक कथांचा शोध, नद्यांचा मानवी चेहरा, स्वभाव, वृत्ती-प्रवृत्ती या अनुषंगाने इतिहासपूर्व इतिहास शोधणे.
पूर्वजांनी नदीविषयक काय लिहून ठेवले आहे, याचा मागोवा घेणे. संदर्भबहुलता आपल्याला पूर्वजांच्या लेखनाचे स्मरण देते. उदाहरणार्थ, 'गंगालहरी'ची आठवण किंवा 'सच्च भण गोदावरी'ची आठवण किंवा गंगावतरणाची आठवण किया सप्तसिंधूची आठवण. मी स्वतः 'गंगालहरी'च्या प्रेमात पडलो आणि त्या निमित्ताने जेव्हा मी शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा जगन्नाथ पंडिताचा जो शेवट झालेला आहे. त्यामध्ये एक नाट्य दडले आहे, याचा मला शोध लागला. त्याबद्दल सहसा कोणी सांगत नाही. जगन्नाथ पंडिताची यवन प्रेयसी आहे. तो तिच्याबरोबर एकनिष्ठतेने राहतो आहे. कर्मठ समाज, त्याची होणारी निर्भर्त्सना आणि म्हणून, कदाचित राजाज्ञेने, त्याने आणि यवनीने गंगासमर्पण केले आहे. पावसाळ्यात नदीकाठच्या ओवऱ्यांमध्ये पाणी आले आणि हे दोघे वाहून गेले, असे सांगितले गेले. पण सूक्ष्म शक्यता अनुभवता येते. इथे 'भव्य शोकनाट्य' आणि कारुण्य दडले आहे. या घटनेची आठवण इथे नद्यांच्या संदर्भात होते आहे. नदी स्वर्गातून येणारी आहे. ती शापितसुद्धा असते. या ठिकाणी अभ्यासपद्धती एका वेगळ्या टप्प्यावर येऊन थांबते. नदीच्या संदर्भात लोकमानस काय सांगते आहे, याचा शोध आपल्याला त्या निमित्ताने घेता येतो. लोककथा, गीते इत्यादींमधून नदी भेटत राहते.लोकमनोव्यापार भेटतो. सात अप्सरा भेटतात. अप्सरा म्हणजे पाण्यातून आलेली अशा अर्थानेसुद्धा. संशोधकांनी म्हटले आहे की, जलमार्गाने येणाऱ्या त्या अप्सरा, त्यामुळे 'सात आसरां'चीही आपल्याला त्या निमित्ताने आठवण करता येते. डोह भेटतो. अशी ही एकूण अभ्यासाची पद्धत आहे.