Skip to product information
1 of 2

Payal Books

Sanskarparv संस्कारपर्व By Baba Bhand

Regular price Rs. 169.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 169.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

गेल्या तीन वर्षांत जगातील सगळ्यांचे जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे. वैश्विक आणि नैसर्गिक संकटांनी सगळ्यांची परीक्षाच पाहिली. या काळात स्वत:ची काळजी घेत आपापली कामे करत बंदिवासाचा अनुभव खूप काही शिकवून गेला.
शरीर आणि मनाची सांगड घालून स्वास्थ्य जपत आपापली कामे करताना रस्त्यातले खड्डे आपल्यासाठीच आहेत, आणि संकटे, अडथळे, चढ- उतरणीत आपल्याला समाधान आणि आनंद देणारे कामच आत्मबळ वाढविते. हा जीवनानुभव खूप शिकवून गेला.
जल, अन्न आणि हवा मनुष्यप्राण्याला जिवंत ठेवते, त्याचबरोबर ज्ञानाच्या संगतीने माणसाचे जगणे सुंदर होत जाते. लेखन, वाचन हे सर्जन संस्कार करणाऱ्या शिडीच्या पहिल्या पायऱ्या आहेत. लेखन सर्जनातून निर्मितीचा आनंद मिळत जातो.
आवडीच्या कामात पुढं सरकायला पायऱ्या अन् शिडीची आवश्यकता असते. प्रत्येक स्वप्नाचा ध्यास पंखात बळ निर्माण करत असतो. आवडीचे काम करणारा प्रत्येक गरुड ध्येयाकडे झेप घेत असतो. तेथे पोहोचण्यास सर्जनप्रेरणाच ऊर्जा पुरवित असते.
हे आहे या संस्कारपर्व यात्रेचे सूत्र...
स्वप्न पाहा. त्याचा पाठलाग करा. खाचखळग्यांशी मैत्री करा... चारचाकी जीवनसूत्रांचा मार्ग अवलंबवा. मेहनत, प्रामाणिकपणा, शेजारधर्म आणि आपल्या देशाची काळजी हा एकांत सर्जनाचा आनंदच जगणे सुंदर करून जातो.