Skip to product information
1 of 2

Payal Books

Sankshipta Maharashtra Shabdkosh Khand 1-2(संक्षिप्त महाराष्ट्र शब्दकोश) by Yashwant R. Date

Regular price Rs. 1,750.00
Regular price Rs. 2,000.00 Sale price Rs. 1,750.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
1928 साली य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शब्दकोश मंडळ लिमिटेड स्थापन झाले आणि महाराष्ट्र शब्दकोशाच्या रचनेला सुरुवात झाली. 1932 पासून एक-एक खंड प्रसिद्ध व्हायला लागला आणि 1938 साली शेवटचा सातवा खंड छापून तयार झाला. आठवा पुरवणी खंड त्यानंतरच्या काळात तयार झाला. सातव्या खंडात व इतर खंडांच्या प्रस्तावनेत हे सर्व खंड तयार करण्याच्या कामाचा सविस्तर इतिहास दिलेला आहे. या सर्व इतिहासावरून एक गोष्ट लक्षात येते की, हे सर्व काम ग्राहकांच्या मदतीनेच पार पाडले आहे. सयाजीराव गायकवाड यासारख्या काही संस्थानिकांनी थोडीफार मदत केली. तर एकंदर सव्वालाख रुपये खर्चापैकी ती मदत दहा-पंधरा हजाराच्यावर नव्हती. संपादक वर्गाने अल्प मोबदला घेऊन दहा वर्षे काम केले. त्यांच्या या त्यागबुद्धीमुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळेच हे काम पार पडू शकले. तरीही अनेकवेळा कर्जाऊ रकमा घ्याव्या लागल्या. पहिल्या वर्षाच्या अखेरीस 867 ग्राहक झाले होते. तर नवव्या वर्षाच्या अखेरीपर्यंत 3181 ग्राहक झाले.

या शब्दकोशाचा विशेष म्हणजे त्यात अवतरणे दिली आहेत. एखादा शब्द मराठीतील कोणत्या ग्रंथात आला आहे त्याचा संदर्भ या शब्दकोशात दिलेला आहे. शब्द गोळा करतानाही अनेक लोकांनी मदत केली. मराठीतील, त्या काळी उपलब्ध असलेले सर्व शब्द गोळा करून या शब्दकोशात दिलेले आहेत. भाषेमध्ये नवीन शब्द सतत घडत असतात हे लक्षात घेता नवीन मराठी महाकोशाची उणीव भासेलच. तरीही या महाराष्ट्र शब्दकोशाचे महत्त्व अजून शंभर वर्षेनाहीसे होणार नाही.

मूळचा महाराष्ट्र शब्दकोश आठ खंडातील आहे व त्याची किंमत रु.8000/- आहे. आठ खंड हाताळणे हे कठीण झाले म्हणून प्रस्तुत 'संक्षिप्त महाराष्ट्र शब्दकोश' तयार केला आहे. हा दोन खंडात आहे व किंमतही कमी आहे. शासकीय पातळीवर महाराष्ट्र शब्दकोशाचा विस्तार करून तो दहा खंडात छापण्याचे प्रयत्न सुरु आहेत त्यास दहा वर्षे लागतील, म्हणून या कालावधीत सर्वसामान्य रसिकाला उपयोगी पडावा म्हणून हा संक्षिप्त महाराष्ट्र शब्दकोश दोन खंडात सादर करीत आहे.