Sankrut Ani Sankrutisathi संस्कृत आणि संस्कृतीसाठी by Rajiv malhotra
राजीव मल्होत्रा विख्यात स्वतंत्र विद्वान आहेत व या समस्येविषयीची त्यांची सखोल जाण, तसेच त्यांचे स्पष्ट, उचित युक्तिवाद असलेले विश्लेषण व टीका दीर्घ काळापासून सर्वज्ञात आहे. त्यांच्या स्तंभांचा व पुस्तकांचा मी नेहमीच उत्सुक वाचक आहे. हे असे पुस्तक आहे, जे भारतीय व पाश्चात्य इंडॉलॉजिस्टांमधील बुद्धिवादी घटकांकडून जतन केले जाईल.
दिलीप के. चक्रवर्ती
एमिरेट्स प्रोफेसर, दक्षिण आशियाई पुरातत्त्वशास्त्र, केंब्रिज विद्यापीठ
संस्कृतचा निःसंदिग्ध प्रेमी म्हणून मी राजीव मल्होत्रांनी तिच्या मायभूमी भारतासह जगात संस्कृत अध्ययनाच्या स्थितीबद्दलचा जो विवाद उघड केला आहे, त्याचे स्वागत करतो. या पुस्तकाने संस्कृतच्या शास्त्रीय गुणवत्तेविषयी, विशेषतः परंपरेच्या अनुभववादावर भर देण्याविषयी आणि ज्ञानाबद्दलच्या भारतीय व पाश्चात्त्य दृष्टिकोनांतील साम्ये व भेदांविषयीच्या चर्चेला चालना मिळावी.
रोद्दाम नरसिंह
प्रख्यात अवकाशशास्त्रज्ञ व पद्मविभूषण पदवीचे मानकरी द बॅटल फॉर संस्कृतमध्ये वैदिक अंतःस्थांना केवळ बहिःस्थांशी युद्ध करण्यासाठी आवश्यक त्या ज्ञानाचे पाठबळ व सामग्री देण्याचेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीला तिच्या मूळ तत्त्वांच्या आधारे चिरस्थायी करण्याचे मोठे सामर्थ्य आहे. सर्व संस्कृतप्रेमी, विद्वान व वैदिक परंपरांचे पाल करणाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक वाचावे व संबंधित मुदयांवर गंभीर बौद्धिक संघर्षासाठी सुचवलेल्या स्वदेश संघात सामील व्हावे.