PAYAL BOOKS
Sankirna Mahabharat By Sunil Desai संकीर्ण महाभारत
Couldn't load pickup availability
Sankirna Mahabharat By Sunil Desai संकीर्ण महाभारत
संकीर्ण महाभारत
महाभारत ग्रंथ चर्चा आणि महाभारतातील स्त्री जीवनाचे चित्रण
रामायण व महाभारत हा हिंदू धर्मियांच्या दृष्टीने अगदी जिव्हाळ्याचा विषय. हे दोन्ही धर्मग्रंथ हिंदूंच्या दृष्टीने पवित्र ! परंतु आजच्या वैज्ञानिक युगात काही मंडळी या धर्मग्रंथांवर व त्यातील विचारांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना हे सर्व काल्पनिक वाटते. ते सद्यः परिस्थितीनुसार त्याकाळात घडलेल्या घटना, प्रसंगांचा विचार करतात. पण माझ्या मते रामायण किंवा महाभारत या ग्रंथाचा अभ्यास अशा पद्धतीने करणे अयोग्य आहे. मी महाभारत या ग्रंथाचा चिकित्सक व संशोधनपूर्वक अभ्यास करून 'संकीर्ण महाभारत' (महाभारत ग्रंथविषयक चर्चा आणि
महाभारतातील स्त्री जीवनाचे चित्रण) हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथामध्ये महाभारत ग्रंथ रचना, त्याचे रचनाकर्ते, कालखंड आणि इतर गोष्टींचा तुलनात्मकरित्या अभ्यास केला आहे. तसेच महाभारतकालीन स्त्रियांचा अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे महाभारत काळात घडलेले अठरा दिवसांचे युद्ध याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे या पुस्तकाचे वाचन करून वाचकाला महाभारताकडे नव्या दृष्टीकोनातून पाहायला निश्चितच मदत होईल._

