Sankarit by Dr. Sanjay Dhole
Regular price
Rs. 176.00
Regular price
Rs. 195.00
Sale price
Rs. 176.00
Unit price
per
विज्ञानकथेत विविधांगी विषय हाताळलेले असून, एखादं विज्ञान, प्रयोग किंवा त्यांचे निष्कर्ष मानवाच्या जेवढ्या भल्यासाठी वापरता येऊ शकतात; तेवढाच त्या विनाशालाही कारणीभूत ठरू शकतात. ‘परिवर्तन’ ही कथा मूळपेशींवर आधारलेली असून ‘मोहीम फत्ते’मध्ये त्यांच्या शोधावर आधारीत आहे. ‘कोळिष्टक’ ही कथा ‘स्पायडर फार्मिंग’ व त्यांच्या जनुकावर आधारलेली आहे. तर ‘अकल्पित ’ ही कथा किरणोत्सारीतून निर्माण होणाऱ्या समस्येवर आधारलेली आहे. ‘संकरित’ ही कथा जनुकांमध्ये हेतुपुरस्सर बदल घडवून आणल्यानंतरचे परिणाम दर्शविते तर ‘अस्तित्व’मध्ये वैद्यकशास्त्रात मानवावरील विधायक प्रयोग दाखविलेला आहे. ‘उद्ध्वस्त’ ही कथा पदार्थाच्या ‘दीपन’ या गुणधर्मावर असून, ‘अखेर तो परतला’ ही कथा स्मृतिपटलांवर आधारित आहे. ‘सॉकर’ ही कथा फुटबॉलच्या रोमांचक खेळावर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून भाष्य केलेली आहे. ‘विचारवहन’ हे मानवी मेंदूतील प्रक्षेपित होणाऱ्या क्षीण लहरींवर आधारलेले आहे. शिवाय ‘दुर्गम्य’ ही कथा भौतिकशास्त्रातील ‘टॅनेलिंग इफेक्ट’वर आधारित आहे.