Skip to product information
1 of 2

Payal Books

Sanhar By Umesh Kadam

Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
जर्मनीमध्ये दुसर्‍या महायुद्धादरम्यान लक्षावधी निरपराध ’ज्यू’ वंशाच्या लोकांचा आणि युद्ध कैद्यांचा अनन्वित छळ केला गेला. त्यापैकी बहुतांशी लोकांची हत्या करण्यात आली. ’ज्यू’ वंशाच्या या लोकांना वेगवेगळ्या छळछावण्यांमध्ये ठेवले जात असे. या छळछावण्यांपैकी एक ’ऑशवित्झ.’ मृत्यूचे माहेरघर अशी ओळख असणारे ’ऑशवित्झ’ आज स्मारक व संग्रहालय म्हणून पोलंड येथे जतन केले आहे. हिटलरचा उजवा हात असणारा क्रूरकर्मा ’रुडॉल्फ’ राईकमन हा ’ऑशवित्झ’ या छळछावणीचा प्रमुख हा या छळछावण्यांमध्ये युद्धकैदी जखमी आणि ज्यू यांची वाढणारी संख्या मोठी समस्या होती. अनेक ’अमानुष’ मार्गांचा अवलंब करूनही हे मार्ग तितकेसे पुरे पडत नव्हते. त्यावेळी ’राईकमन’ने या युद्धकैद्यांना आणि ज्यू लोकांना मोठ्या संख्येने आणि कमी वेळात मारण्यासाठी गॅसचेंबर्स तयार करवले. छळछावण्यात आलेल्या युद्धातून बचावलेल्या ज्यू लोकांना आणि युद्धकैद्यांना सुखी संपन्न जीवनाचे स्वप्न दाखवणारे भाषण राईकमन करीत असे. त्यांच्या आशा पल्लवित केल्यानंतर त्यांची रवानगी गॅसचेंबर्समध्ये केली जात असे. दारे, खिडक्या बंद करून झडपांमधून ’झिकलॉन-बी’ हा अत्यंत विषारी वायू सोडला जात असे. एकावेळी सुमारे पाचशे लोक या गॅसचेंबरमध्ये मावत असत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना ठार करण्याची ही कल्पना राईकमनचीच होती. त्याच्या या योजनेमुळेच तो हिटलरचा ’खास माणूस’ होता. युद्धसमाप्तीनंतर जर्मनीच्या पराभवानंतर राईकमन पळून गेला. आपली ओळख बदलून तो ब्राझिल येथे राहू लागला. इस्त्रायलच्या ’मोसाद’ या गुप्तहेर संघटनेने सापळा रचून त्याची पाळेमुळे खणून काढली. त्याला अत्यंत गुप्ततेने इस्त्रायलला आणले आणि फाशीची शिक्षा दिली.’रुडॉल्फ राईकमन’ या युद्ध गुन्हेगाराला त्याच्या शेवटापर्यंत पोहचवणारी ही उत्कंठावर्धक थरारक कथा वाचकांना शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल.