{"product_id":"sane-gurujinchi-jeevangatha-by-raja-mangalvedhekar-साने-गुरुजींची-जीवनगाथा-राजा-मंगळवेढेकर","title":"SANE GURUJINCHI JEEVANGATHA by RAJA MANGALVEDHEKAR साने गुरुजींची जीवनगाथा राजा मंगळवेढेकर","description":"\u003cspan\u003eपांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांना २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम होते; पण, कवी, लेखक, अनुवादक, संपादक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील नेते अशी त्यांची सप्तरंगी ओळख अधिक गडद आहे. त्यांनी लिहिलेली लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, त्यातील अर्ध्याहून अधिक पुस्तके आजच्या समाजमनाचाही ठाव घेणारी आहेत. साने गुरुजींच्या व्यक्तित्वाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे वापरता येतील, पण त्यांच्या केवळ साहित्याचा विचार करता ‘मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’ हे संबोधन अधिक योग्य ठरेल. अशा या गुरुजींची चरित्रे अनेक लहान-थोरांनी लिहिलेली आहेत, मात्र त्यांचे समग्र म्हणावे असे हे एकमेव चरित्र आहे. त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले राजा मंगळवेढेकर यांनी हे लिहिले आहे. कुमार व युवा अवस्थेत त्यांना गुरुजींचा सहवास लाभला आणि त्यानंतरचे अर्धशतक त्यांनी गुरुजींचेच विचार-कार्य पुढे चालू ठेवले. गुरुजींच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका समजून घेण्यासाठी फक्त एकच पुस्तक वाचायचे असेल तर ते कोणते, या प्रश्नाचे उत्तर “साने गुरुजींची जीवनगाथा” हेच आहे.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Sadhana Prakashan","offer_id":47709039263937,"sku":"","price":690.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/SANE_GURUJINCHI_JEEVANGATHA_by_RAJA_MANGALVEDHEKAR.jpg?v=1780039171","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/sane-gurujinchi-jeevangatha-by-raja-mangalvedhekar-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}