Skip to product information
1 of 2

Payal Books

Samkalin Rajkiy chalvali समकालीन राजकीय चळवळी by Prakashn Pawar

Regular price Rs. 404.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 404.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

समकालीन राजकीय चळवळी : नवहिंदुत्व व जातसंघटना हे पुस्तक तीन विभागांत विभागले आहे. पहिला भाग सोशल इंजिनिअरिंगच्या राजकीय प्रक्रिया व चळवळीवर बेतलेला आहे. नवहिंदुत्व या घटकाच्या आधारे कृतिसज्जता कशी घडली या मुद्द्याचे विश्लेषण केले आहे.

मराठा समाजामध्ये कॉंग्रेसविरोध, सहकार चळवळविरोध, उच्च जातीविरोध, ओबीसी विरोध, अभिजन विरोध असा आर्थिक व राजकीय असंतोष धुमसत आहे, त्यांचेही स्पष्टीकरण केले आहे.

नव्वदीनंतरच्या राजकारणाचे जातसंघटना हे एक वैशिष्ट्य ठरतेे. ओबीसी व दलित समाजातील जात संघटनांचे गेल्या तीन दशकातील केलेले राजकीय दावे, भौतिक हितसंबंधाची स्पर्धा आणि अस्मितांचे राजकारण तसेच गेल्या तीन दशकातील ओबीसी व दलित राजकारणांचे अर्थ स्पष्ट केले आहेत.

नवहिंदुत्व चळवळीतील सत्तासंघर्ष व सत्तासंपादनाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रकल्प व हिंदू राष्ट्रनिर्मितीची चळवळ, जात-संघटनांच्या चळवळीतील इतर मागासवर्ग व अभिजनांमधील सत्तासंघर्षदेखील सविस्तरपणे मांडला आहे.

नवहिंदुत्व आणि जातसंघटना यांचे राजकीय चळवळ या चौकटीत विश्लेषण करणारे हे पहिलेच पुस्तक आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे नेते - कार्यकर्ते व समर्थक - विरोधक यांना अभ्यासासाठी या पुस्तकातून नवे मुद्दे मिळू शकतील, अशी खात्री आहे