Payal Books
Sambhramachee Goshta | संभ्रमाची गोष्ट By P. Vitthal | पी. विठ्ठल
Couldn't load pickup availability
काळाचे निदान करणे अवघड असते. समाजचिंतक आणि सर्जनशील लेखक ते करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. काळाचा तळठाव धुंडाळून मानवी जगण्याच्या अंगोपांगांना वेढून राहणार्या काळसंदर्भांचा उलगडा करण्याचा, आपल्या काळाला समजून घेण्याचा हा एक भाग असतो. गेल्या दशक-दोन दशकांपासून ही प्रक्रिया अधिकाधिक गुंतागुंताची आणि अतर्क्य होत चालली आहे. कारण माणूसपणाच्या विकसनशीलतेला आकार देण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या आणि गेल्या शतकापासून गतिमान झालेल्या आधुनिकीकरण - अत्याधुनिकीकरण या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या अनेकानेक बाबींची विपरीतता समकाळाच्या संभ्रमित रूपाला आकार देणारी ठरली आहे. त्यातील एका दुखर्या वेदनेचा माग काढण्याच्या भूमिकेतून पी. विठ्ठल यांची ही कादंबरी आपल्यासमोर येते. डॉ. आशुतोष पाटील आपल्या जगण्याचा एक भाग असलेला गुंता उकलून त्याच्या दाहक विरूपाचे दर्शन प्रत्ययकारीपणे घडवणारी कादंबरी.
