Salokhyachya Goshti By Amruta Khanderao
Salokhyachya Goshti By Amruta Khanderao
अमृता गणेश खंडेराव यांचे हे मनस्वी लिखाण प्रथमच पुस्तक रूपात समोर येत आहे, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. नव-मध्यमवर्गीय समाजातील त्या एक जागृत संवेदनाशील स्त्री प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संवेदनशील जाणिवांचे प्रतिबिंब या लिखाणामधून आपल्यापर्यंत आता पोहचत आहे.
या लिखाणाचे स्वरूप मुख्यत: छोटे जीवनानुभव त्यावरील भाष्यासहित वाचकांपर्यंत पोहचवणे असे आहे. त्यामुळेच त्या लिखाणाला काहीसे संवादी रूप आले आहे. तसेच काही प्रमाणात मूल्य जाणीव आग्रहपूर्वक सांगणारे हे लिखाण झाले आहे. लेखक लिहिता असणे पुरेसे नसते. तो समाजात किती सजगपणे कृतिशील आहे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. लिहिता लेखक हा व्यापक पातळीवर कृतिशील असेल तरच तो लेखक म्हणून सतत उत्क्रांत होत राहतो. त्याच्या जीवन अनुभवाचे अधिक सखोलपणे आणि तरलपणे आकलन करू शकतो. अमृता खंडेराव यांच्या लिखाणामधून ही सजगता जाणवते. म्हणूनच त्यांचे लिखाण वाचकाला समृद्ध करणारे आहे.
कथा, कविता, ललित, वैचारिक, सामाजिक, पथनाटक, बालसाहित्य, गाणी, स्लोगन, जिंगल्स, जाहिरात लेखन असे लेखनाचे विविध प्रकार अमृता खंडेराव यांनी हाताळले आहेत. दै.सकाळ, मिळून साऱ्याजणी, सेवा दल पत्रिका अशा विविध वृत्तपत्र आणि मासिकांसाठी त्यांनी लेखन केले आहे.
* मागील दहा वर्षात ग्रामस्वच्छता अभियान, शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांचे सामाजिक प्रश्न, पर्यावरण या विषयावर विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्ये सादर केली आहेत.
* ग्रामीण महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्न, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य, ग्रामीण भागातील शाळा आणि बचत गट यांच्याबरोबर विविध विषयांवर काम.
* ग्रामीण भागातील महिलांना वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी जवळपास १०० कार्यक्रमांचे आयोजन.
* विविध सामाजिक विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन.
* मागील दहा वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत शैक्षणिक मार्गदर्शन.
* पाचशेहून अधिक पर्यावरणविषयक कार्यशाळांचे आयोजन.
* सामाजिक आणि जातीय सलोख्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन.
* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा, चित्रकला आणि वक्तृत्व आणि पर्यावरणविषयक स्पर्धांचे आयोजन.
* 'नागपूर सकाळ' या वृत्तपत्रातून 'मूल घडविताना..' या विषयावर स्तंभ लेखन.