Payal Books
Sahjeevan | सहजीवन Author: Dr. Janardan Waghmare|डॉ. जनार्दन वाघमारे
Couldn't load pickup availability
डॉ. वाघमारे यांचे जीवन एक संघर्षयात्रा आहे. जानवळ ह्या मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा डॉ. वाघमारे यांचा प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला. शिक्षणतज्ज्ञ, कुलगुरू, नगराध्यक्ष, राज्यसभा सदस्य असा त्यांचा चढता प्रवास थक्क करणारा आहे. ह्या प्रवासात त्यांच्या पत्नीची साथ त्यांना सततच राहिली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असे आपण नेहमी म्हणतो, पण त्याचा नेमका व नक्की प्रत्यय डॉ. वाघमारे यांचे हे पुस्तक वाचल्यानंतर येईल. ह्या केवळ आपल्या पत्नीविषयीच्या आठवणी नाहीत, स्मरणरंजन नाही, तर एका सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबात पाठीमागे राहून धैर्य एकवटणार्या आपल्या पत्नीचे श्रेय डॉ. वाघमारे यांनी अधोरेखित केले आहे.
