Skip to product information
1 of 2

Payal Books

Sahityikacha Gaon By Anand Yadav

Regular price Rs. 81.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 81.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील, चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या, सरळ वाटणाऱ्या घटनाही साहित्यिकाला मात्र सामाजिक दृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्यावर तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला त्या अधिक खोलवर भिडतात. पुष्कळ वेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादी सांस्कृतिक संदर्भ असलेल्या नेहमीच्या घटनांचा महत्त्वाचा उदात्त संदर्भ जनलोक हरवतात. त्यामुळे त्या सणांना विकृती, विपरीत गती प्राप्त झालेली असते. त्या विकृतिविपरीत गतीच्या पलीकडे जाणीवपूर्वक जाऊन त्या सणांचे मूळ जन्मप्रयोजन विचारी मन शोधते. प्रयोजन कळले की साधे सणही श्रीमंत आणि जिवंत वाटू लागतात. मग ते हवेहवेसे वाटतात. त्यांचे जिवलग, घनिष्ठ नाते संस्कार हरवलेल्या आपल्या मनाला कळते आणि मनही सजग, समृद्ध होते. चांगल्या साहित्याच्या र्निमितीच्या प्रत्यक्षातील जन्मखुणा, घटनास्थळे यांच्याविषयीची जिज्ञासा सुजाणसुशिक्षित माणसाला सतत असते. त्या जिज्ञासापूर्तीमुळे साहित्यकृतींची जन्मरहस्ये कळतात, जन्मदात्या साहित्यिकाच्या वृत्तिप्रवृत्ती समजतात. जिज्ञासापूर्तीचा निखळ आनंद मिळतो. प्रस्तुत संग्रहात याच (समाज, संस्कृती आणि साहित्य) तीन पैलूंवर आधारित लालित्यपूर्ण शब्दशिल्पे आणि रंगचित्रे समाविष्ट आहेत. रसिकांना ती अंतर्मुख करतील, जगण्याचे उत्कट क्षण देतील, अनुभवसमृद्ध करतील.