Skip to product information
1 of 2

Payal Books

Sahityamulyanchi Samiksha | साहित्यामूल्यांची समीक्षा Author: A. N. Pednekar | आ. ना. पेडणेकर

Regular price Rs. 110.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 110.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

प्रा. गो. वि. करंदीकर (विंदा करंदीकर) यांनी गेल्या काही वर्षांत वेळोवेळी समीक्षामूल्यांवरील दिलेल्या इंग्रजीतील भाषणांच्या निबंधांचे हे मराठी अनुवाद आहेत. वाङ्मयनिर्मिती, भाषांतर, समीक्षा, अध्यापन यांतील अनुभवांतून साहित्य ही जीवनवेधी कला आहे, ललितकला नव्हे, हा त्यांचा विश्वास दृढ झाला. विशुद्धता, आत्मनिष्ठा, उत्स्फूर्तता, सौंदर्य, इ. समीक्षा मूल्यांच्या मननातून हे लेखन झाले. वेगवेगळ्या काळात हे लेखलिहिले असल्यामुळे दृष्टिकोण आणि मांडणी यांत फरक दिसेल; मात्र मूळ भूमिका समीक्षकाची आहे. कलावंत, समीक्षक आणि सर्वसाधारण वाचक यांची साहित्यविषयक जाण हे लेखन अधिक चिकित्सक व प्रगल्भ करील. साहित्याशी मूल्यांचा संबंध कितपत अर्थपूर्ण आहे व त्यावर सर्वस्वी अवलंबून राहणे यथार्थ आहे किंवा कसे याचे एक सुजाण भान या लेखनातून येईल. विरोधी दृष्टिकोणाबाबत युक्तिवाद करीत, निर्मितीप्रक्रियेच्या व्यामिश्र वास्तवतेची चर्चा करीत ते आपले म्हणणे पटवतात. विद्वत्ता आणि मौलिकता यांच्या अपूर्व मेळाने या संग्रहाचे मोल वाढले आहे.