काळ बदलला की समाजवास्तवही बदलते. दोन पिढ्यांच्या विचारात सातत्याने अंतर पडलेले दिसते. हे अंतर विचार करण्याच्या नव्या पध्दतींचे, प्रवृत्ती बदलाचे आणि समकालाला प्रतिसाद देणारे असते. त्याचे पडसाद साहित्यकृतींमधूनही मुखर होत असतात. विचारांचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत जाते. एका परीने हे अभिसरण अव्याहत चालू असते. मराठी साहित्याच्या विकसनात घडलेली अभिसरणाची प्रक्रिया हा साहित्याच्या चिंतनाचा भाग ठरतो. याच चिंतनातून अभिसरणाबरोबरच नकळत स्थित्यंतराचाही वेध घेतला जातो. आकलनाबरोबरच साहित्यकृतींची विश्लेषणात्मक चर्चा करणेही आवश्यक ठरते. वाङ्मयाच्या क्षेत्रात दाखल झालेल्या नव्या अभिव्यक्ती पध्दती, ठोसपणे व्यक्त झालेले प्रवाह आणि त्यातून प्रकटणारा मानवी जीवनविषयक चिंतनाचा कलात्मक आविष्कार याविषयीच्या नोंदी समीक्षेत केल्या जातात. त्या किती गंभीरपणे होतात यावर समीक्षेच्या वाटचालीचा दर्जा ठरतो. एखादी संकल्पना किंवा साहित्यशास्त्र यांचा अनुबंध जोडत समीक्षाव्यवहार सिध्द करण्याचा प्रयत्न केला जातो. हा व्यवहार तंतोतंत पध्दतीने असाच होतो असे नाही. तथापि समकालातील साहित्यनिर्मिती डोळ्यासमोर ठेवून आणि साहित्य व्यवहाराचे भान बाळगून चिंतनशील लेखन करणे ही कुणाही समीक्षकाची महत्त्वाची जबाबदारी असते.
मनोगतातून…
Payal Books
Sahityachi Samajikata | साहित्याची सामाजिकता by Dr.Satish Badwe | डॉ.सतीश बडवे
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
