Skip to product information
1 of 2

Payal Books

Sahityabandh | साहित्यबंध by Dr.Satish Kamat | डॉ.सतीश कामत

Regular price Rs. 314.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 314.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

ॲरिस्टॉटल या विचारवंताने साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले आहे. ॲरिस्टॉटलच्या या विधानाची प्रचिती ‘साहित्यबंध’ हे पुस्तक वाचताना येते. आजच्या जागतिकीकरणातही वाङ्मयनिष्ठा जोपासणाऱ्या व वृद्धिंगत करणाऱ्या लेखकांत वाढ होत आहे. या लेखकांजवळ असणारे साहित्याविषयीचे आत्मभान अचंबित करणारे आहे. वर्तमानातल्या प्रश्नांना भिडण्याचे व या प्रश्नांचे सखोल चिंतन करणारे लेखनबळ त्यांच्या कलाकृतीतून जाणवते. सामाजिक मूल्यभान अधोरेखित करून मानवी जगण्याचा शोध घेण्याचं काम ही लेखक मंडळी करताना दिसून येतात. मानवी भाव-भावनांचे विविध पैलू व जगण्यातील नैतिकता हरवू न देणाऱ्या या लेखकांच्या कलाकृतीची आशयघन चर्चा व साहित्य चिंतन डॉ. सतीश कामत यांच्या ‘साहित्यबंध’ या पुस्तकात अनुभवता येते. नाटक, कथा, कविता, प्रवासवर्णन या वाङ्मय प्रकारांची संरचना, घटक आणि वैशिष्ट्याची मांडणी ‘साहित्यबंध’ मध्ये आहे. हा ‘साहित्यबंध’ वाचणाऱ्यांना व लिहिणाऱ्यांना अधिक जवळ आणेल, यात शंका नाही.- डॉ. धनाजी गुरव