Skip to product information
1 of 2

Payal Book

Sahitya Akadami’che Mankari [‘ साहित्य अकादमी’ चे मानकरी]

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
साहित्य अकादमी एकूण चोवीस भाषांमधील पुस्तकांना प्रतिवर्षी पुरस्कार देत असते. पुरस्कार द्यायची योजना अकादमीने १९५५मध्ये सुरू केली. मराठी भाषेतील पहिला पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथाला मिळाला. गांधलीकर यांच्या प्रस्तुत पुस्तकात तर्कतीर्थांच्या पुस्तकापासून आजतागायतच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकांची चर्चा, अर्थातच लेखकांच्या चर्चेसह केलेली आहे. अशा प्रकारच्या पुस्तकाची मराठी वाचकाला गरज होती. त्यातून गेल्या पाऊणशे वर्षांतील महाराष्ट्राच्या वाङ्मयीन अभिरुचीचा आणि साहित्य व समीक्षा यांच्या व्यवहाराचा इतिहासच उलगडता येतो. स्थित्यंतरे समजून येतात. त्या त्या वर्षातील पुरस्कारप्राप्त ग्रंथ हे त्या दरम्यान मराठी साहित्यात होत असणान्या चळवळीचे प्रातिनिधिक नमुने मानण्यास हरकत नाही. साहित्यात समाजव्यवहाराचे प्रतिबिंब पडलेले असते, ही सर्वमान्य समजूत ग्राह्य धरली तर या प्रातिनिधिक नमुन्यांवरून तत्कालीन मराठी समाजाचे दर्शन घडवणे शक्य आहे, असेही म्हणता येते.