Payal Books
Sadhak Swamincha By Ritesh Vedpathak
Couldn't load pickup availability
Sadhak Swamincha By Ritesh Vedpathak
दत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेले असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मला तरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा ‘गिरनार’ ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला आणि आजही पुरवत आहेत. बरीच मंडळी मागे लागतात की, ‘आम्हालासुद्धा तुमच्या सोबत घ्या’, पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही. अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्वकष्टाच्या साधनेने. उगाच ओढून-ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्त्वाची. नामस्मरणाचा महिमा अपरंपार आहे यात वादच नाही. भले भले संत-महात्मे पुराणांमध्ये उल्लेख करून गेले याच गोष्टींचा. पण आमची मानसिकता अशी की आम्हाला सहज साध्य झाले पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट सोसायची तयारी नसते. मी-मी करतांना मीच आडवा येतो आणि साधनेची माती करून जातो. त्यामुळे येथे काहीही साध्य होत नाही, आणि महाराज काही सोडणार नाही, दहा वेळा बजावून देखील ऐकले नाही तर सळो को पळो करणार आणि अक्कल आली की सरळ रेषेत आणणार. तोपर्यंत वेळ जातो आणि कष्ट खूप करावे लागतात, पण पर्याय नसतो. म्हणूनच वेळेवर योग्य वागणे गरजेचे आहे. सरळ साधे नाम घ्यावे, त्याच रंगी रंगावे आणि समाधान मानावे, परमार्थ त्यातच मिळतो. उगाच मला हवेच म्हणून काहीच मिळणार नाही. उलट हातातले गमवायची वेळ येते. त्यापेक्षा मिळेल ते घेऊन जपले तर कृपा वर्षाव अनंत कृपेने राहतो.
