SAD GHALATO KALAHARI साद घालतो कालाहारी BY Mandar Godbole
साद घालतो कालाहारी
मार्क ओवेन्स
मंदार गोडबोले
आपल्याबरोबर एक बदली कपड्याचा जोड आणि एक दुर्बिण वगळता बाकी विशेष काही न घेता एक तरुण अमेरिकन जोडपे, मार्क आणि डेलिया ओवेन्स, यांनी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे एक थर्ड हँड लँड रोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात खोलवर मजल मारली. तिथे ते सात वर्षे राहिले, अशा ठिकाणी जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडप्याने आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास सुरू केला. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते त्यांनी कधीही माणूस पाहिला नव्हता. ओवेन्स जोडप्याच्या सिंहांबरोबरील आणि ब्राऊन हायना, कोल्हे, जिराफ आणि त्यांना भेटलेल्या इतर अनेक प्राण्यांबरोबरच्या आयुष्याची गोष्ट.
या धरतीवरील शेवटच्या आणि सगळ्यात मोठ्या आणि अस्पर्शित भूभागात या जोडप्याच्या आयुष्यात जी संकटे आली त्याचे खिळवून ठेवणारे वर्णन असलेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च खपाचे पुस्तक..