Payal Book
Saad Ranvatanchi Bharatatil Aranyanchya Bhatkantisathi Sobati by Anuj Suresh Khare
Couldn't load pickup availability
Saad Ranvatanchi Bharatatil Aranyanchya Bhatkantisathi Sobati by Anuj Suresh Khare
आपला परिसर, जंगल कसं बघायचं हे आपण कधी शिकलेलोच नसतो. त्यामुळेच कदाचित जंगलात किंवा एखाद्या शांत, निवांत ठिकाणी गेल्यावर लोक विचित्र वागताना दिसतात. कुणी मोठमोठ्यांदा गाणी लावतं, कुणी जोरजोरात गप्पा मारताना दिसतं. त्यामुळे आजूबाजूची शांतता, पक्ष्यांचे आवाज अनुभवता येतच नाहीत. वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी बघायचे तर शांतता लागते, संयम बाळगावा लागतो; हे सगळं माणसांना कसं कळावं? प्रत्येक जंगलाचे किंवा वातावरणाचेही काही नियम असतात. हे नियम पाळले तर निसर्ग सुरक्षित राहील आणि त्याचवेळी माणूसही सुखी होईल.
कुठल्या जंगलात काय बघाल, कोणते प्राणी, पक्षी प्रसिद्ध आहेत, त्या त्या जंगलाची एखादी विशेष गोष्ट यात वाचायला मिळेल. सोबतीला अनेक उत्तम छायाचित्र असल्यामुळे जंगलाची एक झलकही पाहायला मिळेल.
निसर्ग पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक पर्वणी ठरेल तर ज्यांना निसर्गात भटकंती करायची आहे, निसर्ग समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे उत्तम सोबती ठरेल.
