Rudravarsha |रुद्रवर्षा Author: Vaman Patrikar |वामान पात्रीकर
अपंग शरीराला खंबीर मन मिळाले की, नियतीसुद्धा शरमून खाली पाहते त्याची कथा म्हणजे ही कादंबरी. ही कादंबरी वाचताना जन्मत:च अधुअपंग असलेल्या कृष्णाची ही कधीही न संपणारी फरफट व त्या यातनामय फरफटीवर ताण करून चिवटपणे मार्ग काढत राहणारा कृष्णा, जीवनाचे असे काही रुद्र क्षण दाखवतात की, त्याने वाचक हादरून जातो, पण ही सर्व कहाणी सांगताना लेखकाच्या मायेचे, काळजीचे, सहसंवेदनेचे, वात्सल्याचे असे काही अलवार अस्तर या निवेदनाला लाभले आहे की, ही कादंबरी थरारक, रोमांचक, निवेदनाच्या पातळीवरून उठून आत्मविश्वासाने पण शालीनपणे कलेच्या पातळीवर उभी राहते. सुगंध यावा पण कुठून ते कळेना, असे लेखकाचे करुणामय मन कृष्णाच्या कथेचे बोट धरून हळुवारपणे चालत राहते. - महेश एलकुंचवार