Payal Books
Roj Navi Suruvat By Dr. Savita Apte
Couldn't load pickup availability
हे पुस्तक नेमकं कुणासाठी? शुभार्थींची काळजी घेणार्या शुभंकरांसाठी तर नक्कीच; परंतु स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराचा अनुभव ज्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात आलेला नाही, अशा सर्वांसाठीसुद्धा या पुस्तकाचं मूल्य तेवढंच महत्त्वाचं आहे. स्वत:पलीकडे बघण्याची इच्छा ज्यांना आहे, ते सारेच हे पुस्तक वाचू शकतात.
मित्रांनो, ही काही कादंबरी नव्हे किंवा हा काही लघुकथांचा संग्रह नाही. संवादाच्या आवरणाखाली मानसिक समुपदेशन कसं उमलत जातं, अगदी सामान्य म्हणून ओळखली जाणारी माणसं स्वत:च्या विचार-भावनांचं नियमन कसं करतात, आपल्या शुभार्थीकडे माणूस म्हणून कसं पाहू शकतात, हे तुम्हाला या पुस्तकातून निश्चितच कळेल. म्हणून प्रत्येक प्रकरण अगदी संथपणे वाचा, समजून घ्या, जाणून घ्या. तसं केलंत, तर तुमच्या लक्षात येईल की, या सगळ्या गुंतागुंतीच्या समस्या फक्त स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांच्याच नाहीत; तर अशा प्रत्येक व्यक्तीच्या आहेत, ज्याला मन आहे...
