PAYAL BOOKS
Riddles In Hinduism By Dr. Babasaheb Ambedkar (रिडल्स इन हिंदुइझम )
Couldn't load pickup availability
Riddles In Hinduism By Dr. Babasaheb Ambedkar (रिडल्स इन हिंदुइझम )
हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची संख्या जगभरात सुमारे शंभर कोटी एवढी आहे. ज्या लोकांना हा धर्म प्रिय आहे त्यांना भीमराव रामजी आंबेडकर हिंदू हा धर्म तरी आहे का? हिंदू कोणाला म्हणायचे? हे कूटप्रश्न विचारतात.
रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक आंबेडकरांच्या मृत्युपूर्वी प्रकाशित होऊ शकले नाही. अखेर महाराष्ट्र सरकारने १९८७मध्ये ते मुद्रित केले तेव्हा त्यावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेनेने केली. अशा वेळी उदारमतवादी लोकांनी आपली तोंडं दुसऱ्या दिशेला वळवली आणि
दलित लोकांनी काही प्रती वितरित केल्या.
ज्या वेळेस उजव्या विचारांचे हिंदू, ‘आंबेडकर आमचे आहेत’ असा दावा करीत आहेत, अशा वेळी प्रस्तुतचा प्रखर टीकाग्रंथ आणि त्याला जोडलेल्या प्रकाशझोत टाकणाऱ्या तळटीपा हे दाखवून देतात, की आंबेडकर यांना कोणत्याही बाबतीत व कोणत्याही कारणाने हिंदू
धर्माबद्दल प्रेम नव्हते. “वेद म्हणजे क्षुल्लक अशा पुस्तकांचा संच आहे”
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
