Payal Books
Re-skilling : Kamateel Pragatisathi, Swatahachya Anandasathi by Vinod Bidwaik
Couldn't load pickup availability
नोकरी मिळाली की बहुतेकांचं पुढचं शिकणं थांबून जातं. नव्या गोष्टी शिकल्याने कंपनीला पुढे जायला मदत तर होतेच;पण व्यक्ती म्हणूनही व्यक्तीचा विकास होत असतो. सतत नव्या गोष्टी शिकत राहिल्याने नोकरीच्या स्पर्धेत टिकता येतंच शिवाय नवीन जबाबदाऱ्यांसाठीही तुम्ही तयार होता. हे सगळं कसं करायचं? त्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्त्वात हव्यात? स्वतःचा सतत कौशल्यविकास कसा करून घेता येईल?
हे सगळं समजून घेऊन, स्वतःची प्रगती साधायची असेल तर वाचायलाच हवं, 'रिस्किलिंग:कामातील प्रगतीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी'.
लेखकाविषयी :
विनोद बिडवाईक हे मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स) आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांना तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव ह्या क्षेत्रात आहे. मोठमोठया भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये त्यांनी उच्चपदावर काम केलेले आहे.
ते सध्या एपी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपमध्ये ग्रुप डायरेक्टर-एचआर म्हणून काम करत आहेत.
विनोद बिडवाईक हे मानव संसाधन, मनुष्यबळ विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. भारतीय आणि बहुराष्ट्रीय संस्थेमध्ये उच्चपदावर काम करण्याचा तब्बल २५ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सध्या ते ए पी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपचे पीपल आणि कल्चर विभागाचे समूह संचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते अल्फा लावलमध्ये उपाध्यक्ष – एच आर, तसेच त्यांनी डि एसएम इंडियामध्ये संचालक – एच आर म्हणून काम पहिले आहे. त्यांनी महिंद्रा & महिंद्रा, सेम्पेरिट ग्रुप, इंडियन स्टीलमध्ये अनेक पदावर काम केलेले आहे. ह्या सर्व संस्थांमध्ये ते व्यवस्थापन मंडळाचे सभासद राहिलेले आहेत.
मनुष्यबळ विकास, मानव संसाधन, बिजिनेस स्ट्रॅटेजी, टॅलेंट मॅनेजमेंट, संस्थेची पुनर्रचना, एच आर परिवर्तन, नेतृत्व विकास यासारख्या जटिल विषयावर त्यांनी काम केलेले आहे. त्यांची आतापर्यंत ३ मराठी आणि ४ इंग्रजी पुस्तके लिहिलेली आहेत.
व्यवस्थापन जर्नल्स आणि मासिकांमध्ये ते नियमितपणे लिहितात. ते बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन, एनआयपीएम आणि एनएचआरडीचे आजीवन सदस्य आणि वेगवेगळ्या मंचांवर नियमित वक्तेआहेत. ते इंग्रजी आणि मराठी दैनिके आणि मासिकांमध्ये नियमित स्तंभलेखकही आहेत.
