Payal Books
RAW रॉ - अनुषा नंदकुमार, संदीप साकेत / Anusha Nandkumar and Sandeep Saket
Couldn't load pickup availability
माहिती ही ताकद असते, असे म्हटले जाते आणि इतर कुठल्याही यंत्रणेपेक्षा ही गोष्ट गुप्तचर यंत्रणांना अतिशय चपखलपणे लागू होते.
सन १९६२चे चीनचे युद्ध आणि १९६५चे पाकिस्तानचे युद्ध या १९६०च्या दशकातील दोन
घटनांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेची तातडीने पुनर्रचना आणि पुनरुज्जीवन करण्याची गरज
अधोरेखित झाली होती. या दोन्ही युद्धांच्या वेळी, माहिती गोळा करण्यातील धक्कादायक
अपयश समोर आले होते. चित्रपटांनी आणि कादंबऱ्यांनी उभ्या केलेल्या गुप्तचराच्या
अद्भुतरम्य प्रतिमेच्या अगदी विरुद्ध असलेले काव हे गुप्तचर यंत्रणेची पुनर्रचना करण्याची
मुख्य जबाबदारी पेलण्यास अत्यंत पात्र व्यक्ती होते.
भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंगच्या म्हणजेच 'रॉ'च्या संस्थापक-प्रमुखाने
प्रसिद्धीच्या झगमगाटापासून अतिशय दूर राहून काम करण्यास आणि जगण्यास प्राधान्य दिले.
संयतपणे आणि सुसंस्कृतपणाने काम करत राहिल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले नसले
तरी काव यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेला जागतिक नकाशावर नेऊन ठेवले यात कसलीच
शंका नाही. या उत्कंठापूर्ण आणि वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकात अनुषा नंदकुमार
आणि संदीप साकेत यांनी आधुनिक भारतीय गुप्तहेर यंत्रणेचा पाया कसा घातला गेला, याचा
मागोवा घेतला आहे आणि नव्यानेच स्थापन झालेल्या 'रॉ'ने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून
देण्यात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची रोचक माहिती दिली आहे.
