Payal Books
Ratnankit Parv रतनांकित पर्व by Sandhya Ranade
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भारतीय समाजमनाला आणि उद्योग जगताला मोहून टाकणारं रतन टाटा यांनी आयुष्यात माणसं आणि संस्था जोडल्या, त्या त्यांच्या नैतिकतेवर आधारित व्यावसायिक नीतीमुळेच! व्यवसाय कौशल्य, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अचूकतेचा आग्रह आणि मुख्य म्हणजे व्यवसायवृद्धीचा ध्यास, या सगळ्या गोष्टींमुळे हाती घेतलेल्या कामाचं सोनं करणं, तेही कुठलेही गैरव्यवहार न करता त्यांना सहज जमतं. त्यातून ते एक 'परफेक्शनिस्ट' हे विशेषण सहजपणे लावता येईल, असे व्यावसायिक बनले. एक बलाढ्य उद्योगपती म्हणून वारूपाला आले. जे काम करायचं ते निर्दोष, उत्कृष्ट आणि परिपूर्ण असायलाच हवं या बाबतीत ते विशेष आग्रही राहिले. आणि त्यातूनच ते घडले देशाला ज्यांचा अभिमान वाटावा, असे उद्योजक! ते फक्त व्यावसायिक वर्तुळातच नव्हे, तर या वर्तुळाबाहेरच्या लोकांसाठीही ठरले एक आदर्श, दानशूर, अनुकरणीय आणि पारदर्शक अशी व्यक्ती! नैतिकतेचा, नैतिकदृष्ट्या अचूक असणाऱ्या नेतृत्वाचा आणि या नैतिकतेचा स्वतःच्या संपूर्ण कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतरच्या कालखंडात सातत्याने वापर करण्याच्या त्यांच्या आग्रहाचा प्रत्यय रतन यांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यातून भारतीय जनतेला वरचेवर आला आहे.
