Skip to product information
1 of 2

Payal Books

Ratnancha Zad By Padmaja Phatak

Regular price Rs. 200.00
Regular price Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publicaion
ताराबाई मोडक यांच्या चरित्रलेखनापासून ते समाजशास्त्रीय, वैज्ञानिक संशोधनपर लेखनाकडून कथालेखन व अनुभवपर लेखन- अशी वळणं घेत पद्मजा फाटक (मजेत) यांच्या 'रत्नांचं झाड' या अनोख्या ललित संग्रहाकडे आपण पोहोचतो.
या संग्रहात एकूण चौदा लेखांची वीण अतिशय सुंदरपणे गुंफली आहे. हा संग्रह म्हणजे केवळ तरल भावना आणि शब्दसौंदर्याने नटलेल्या लेखांचा संग्रह नव्हे; तर यामधील प्रत्येक लेखात विषयविविधता, मार्मिक भाष्य, अभिजात व कसदार भाषाशैली, मधूनच डोकावणारी तल्लख विनोदबुध्दी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन अशा सर्वच गोष्टी अनुभवता येतात. त्यामुळे प्रत्येक लेखाचा विषय व धाटणी जरी वेगळी असली तरी त्यात दिलेले अनुभव, संवेदना आणि सहजपणे मांडलेला वैचारिक व चिंतनशील दृष्टिकोन हे या लिखाणाचे समान धागे ठरतात.
विविध रत्नांनी डवरलेलं हे झाड वाचकाला निश्चितच एक व्यापक जीवनानुभूती आणि एक वेगळं समाधान देईल!