Ratna Pratima (रत्न प्रतिमा) By Shashi Bhagwat शशी भागवत
Ratna Pratima (रत्न प्रतिमा) By Shashi Bhagwat शशी भागवत
रत्न- प्रतिमेचे गुंतागुंतीचे अनेक पदरी महावस्त्र श्री. भागवतांनी मोठ्या हुशारीने विणले आहे. या कथानकाला प्राचीन काळाची डूब देण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. आजच्या भाषासरणीशी अपरिचित अशा अनेक संस्कृत शब्दांचा वापर त्यांनी मोठ्या चतुराईने केल आहे. ही अद्भुतरसाची वाट थोडी अवघड. तीवर फारसे कुणी पाऊल घालीत नाही. कुणी या वाटेने माता सरस्वतीच्या दालनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाच तर अपार कष्टान्शिवाय त्याला या प्रांतात यश लाभणे अशक्यप्राय. 'मर्मभेद' कादंबरी लिहून श्री. शशी भागवतांनी या प्रांतात प्रवेश तर केलाच, पण यशाचा झेंडाही रोवला. 'रत्न-प्रतिमा' लिहून त्यांनी त्या प्रांतातला आपला शिक्का खणखणीत बंदा रुपया आहे, ही गोष्ट सिद्ध केली आहे.