Payal Books
Rashtrasant TukDoji Maharaj By: Ad. Rameshchandra Pardeshi
Couldn't load pickup availability
भारतीय संत परंपरेत, आधुनिक काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्थान आगळे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. राष्ट्रालाच देव मानून त्याची पूजा करणारे ग्रामविकास, राष्ट्रीय एकात्मता, मानवता, सर्वधर्मसमभाव, विश्वशांती यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे, स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सक्रिय आंदोलन करून तुरुंगवास भोगणारे आणि स्वातंत्र्याप्राप्तीनंतर स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी जीवाचे रान करणारा व प्रसंगी देशाच्या युद्धसीमेवर प्रत्यक्ष जाऊन भारतीय जवानांमध्ये वीरश्री निर्माण करण्यासाठी शत्रूच्या तोफगोळ्यांची पर्वा न करता भजन गाणारा, हा संत आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे आणि कर्तृत्वामुळे संतांच्या मालिकेमध्ये म्हणूनच वेगळा वाटतो. त्यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण भारतमातेच्या उत्थानासाठी, सेवेसाठी खर्च केला आणि भारत एक चारित्र्यसंपन्न बलशाली देश व्हावा, यासाठी अहर्निश झटले म्हणूनच भारतीय संत परंपरेत आपल्या कार्याने 'राष्ट्रसंत' ही पदवी प्राप्त करणारे ते पहिले संत ठरले.
