Payal Books
Rarang dhang nantrरारंग ढांग नंतर श्रीकृष्ण सवदी
Couldn't load pickup availability
वास्तवाचे चित्रमय दर्शन घडवणारे एक नामांकित लेखक म्हणजे प्रभाकर पेंढारकर, 'रारंगढांग' ही त्यांची गाजलेली कादंबरी. या कादंबरीची उत्तरकथा (सीक्वल) लिहिण्याचं आव्हान 'चंद्रकांत' मासिकानं दिलं, ते स्वीकारलं अन् पेललं
प्रा. श्रीकृष्ण शामराव सवदी यांनी. सवदी हे मुळात इंग्रजीचे प्राध्यापक. पण त्यांनी प्रदीर्घ सेवा बजावली ती डिफेन्स अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये अत्यंत उच्च पदावर. वाङमयीन व व्यावसायिक अनुभवातून मिळालेल्या बळाच्या जोरावर ते 'रारंगढंग'चं आव्हान स्वीकारु अन्- पेलू शकले. पेंढारकरांपेक्षा सवदींची शैली वेगळी असली तरी 'रारंगढंग'चं प्राणतत्त्व त्यांना सापडलं आहे. मूळ कथेचा पोतही या उत्तरकथेत बरोबर उतरला आहे
उत्तरकथेची कल्पना पेंढारकरांना आवडली होती. सवदी लिखित या उत्तरकथेला त्यांनी नक्कीच दाद दिली असती. आता कसोटी आहे ती वाचकांच्या रसिकतेची! मात्र ती विद्वत्तेच्या बेडीत अडकू नये !
- डॉ. चंद्रशेखर बर्वे