Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Rani Ahilyabai राणी अहिल्याबाई By Vijaya Brahmankar विजया ब्राह्मणकर

Regular price Rs. 400.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 400.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Rani Ahilyabai राणी अहिल्याबाई By Vijaya Brahmankar विजया ब्राह्मणकर 

ज्यांच्या कर्तृत्वाची मोजदाद करण्यासाठी इतिहासाची पानेही अपुरी पडावीत, अशा काही महनीय व्यतिमत्त्वांपैकी एक म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर.

चौंढीच्या एका साध्या घरातून सुरू झालेला अहिल्याबाईंचा प्रवास माळव्याच्या राज्यकारभारापर्यंत पोचतो. या प्रवासात त्यांना लाभलेले प्रेम, नाती, संसार, जबाबदार्या आणि एकामागून एक आलेले आघात - या सगळ्यांतून घडत गेलेली अहिल्या या कादंबरीत वाचकांसमोर उभी राहते. बालपणीची चुणचुणीत, श्रद्धाळू आणि चिकित्सक अहिल्या; संसारात रमलेली पत्नी आणि आई; दुःखाने विदीर्ण झालेली स्त्री; आणि अखेरीस प्रजेच्या सुखदुःखाशी एकरूप होऊन राज्याची धुरा समर्थपणे वाहणारी राणी - असा तिच्या व्यतिमत्त्वाचा प्रवास या कादंबरीतून उलगडत जातो.

इतिहासातील ज्ञात घटनांच्या पलीकडे जाऊन अहिल्याबाईंच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न लेखिका विजया ब्राह्मणकर यांनी केला आहे. तिच्या श्रद्धेइतकाच तिचा विवेक, तिच्या कर्तृत्वाइतकेच तिचे दुःख, आणि राणीच्या वैभवाइतकीच तिच्यातली माणूस म्हणूनची हळवी बाजू या कादंबरीतून जाणवते.

ही केवळ एका कर्तबगार राणीची चरित्रकथा नाही; ही एका सामान्य मुलीचे असामान्य व्यतिमत्त्वात रूपांतर घडवणार्या जीवनप्रवासाची कहाणी आहे.