Payal Books
Raktamudra By G. A. Kulkarni रक्तमुद्रा : जी. ए. कुलकर्णी (संपा. रामदास भटकळ)
Couldn't load pickup availability
Raktamudra By G. A. Kulkarni रक्तमुद्रा : जी. ए. कुलकर्णी (संपा. रामदास भटकळ)
जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित झालेला त्यांच्या निवडक कथांचा हा संग्रह. यापूर्वी ‘डोहकाळिमा’ या संग्रहात जीएंच्या ‘निळासांवळा’, ‘पारवा’, ‘हिरवे रावे’ आणि ‘रक्तचंदन’ या संग्रहांतल्या निवडक कथा प्रकाशित झाल्या आहेत. ‘रक्तमुद्रा’मध्ये ‘काजळमाया’, ‘पिंगळावेळ’ आणि ‘सांजशकुन’ या संग्रहांतल्या निवडक कथा एकत्रित केल्या आहेत. जीएंच्या कथांचे प्रकाशक आणि त्यांच्या साहित्याचे चाहते असलेले रसिक वाचक या नात्याने रामदास भटकळ यांनी या संग्रहाचे संपादन केले आहे.
या संग्रहासाठी कथांची निवड करणे हे एक मोठे कठीण काम होते. भटकळांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, “या कथांतून सर्वोत्कृष्ट निवडणे म्हणजे रत्नांच्या राशीत हात घालून सर्व रत्ने आपल्या चिमुकल्या मुठीत मावत नाहीत म्हणून दुःखी होण्यासारखे आहे.” ‘काजळमाया’, ‘पिंगळावेळ’ आणि ‘सांजशकुन’ या तीन खाणींमधून आपल्या रत्नपारखी नजरेने रामदास भटकळ यांनी निवडलेली ही पंधरा कथारत्ने ‘रक्तमुद्रा’मध्ये रसिकांना सापडतील. ‘रमलखुणा’ संग्रहातल्या दोन श्रेष्ठ दीर्घ कथा स्वतंत्रपणे उपलब्ध असल्यामुळे सोडाव्या लागल्या.
प्रस्तावनेत भटकळांनी जीएंच्या कथांकडे अगदी वेगळ्या नजरेने पहिले आहे. आतापर्यंत अनेक समीक्षकांनी जीएंच्या कथेच्या केलेल्या विचारांहून वेगळा विचार प्रस्तावनेत आला आहे. या कथेची आजवर न जाणवलेली अनेक सौंदर्यस्थळे भटकळांनी उलगडून दाखवली आहेत. जीएंच्या कथांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्यांच्या प्रस्तावनेमुळे वाचकांना मिळू शकेल. ”
