Rakta Aani Paus| रक्त आणि पाऊस Author: Nagnath Kotapalle| नागनाथ कोत्तापल्ले
नागनाथ कोत्तापल्ले यांचा ‘रक्त आणि पाऊस’ हा कथासंग्रह अनेक दृष्टीने लक्षणीय आहे. जीवनानुभवाचे वैविध्य आणि कथा या वाङ्मयप्रकाराची नेमकी समज हे त्यांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण जीवनानुभवापासून ते नागर जीवनापर्यंत आणि सरंजामी जीवनापासून ते आधुनिक जीवनातील ताणतणावापर्यंतचे चित्रण त्यांच्या कथालेखनामधून प्रकट होते. जीवनातील दाहक वास्तवाबरोबरच तरल अनुभवांची प्रतीती त्यांची कथा देते. विविध वयोगटातील आणि वृत्तीप्रवृत्तीची माणसे त्यांच्या कथालेखनातून प्रकट होत राहतात. वास्तवाला थेट भिडण्याची क्षमता, सूक्ष्म निरीक्षण, भाषेची संपन्नता आणि प्रयोगशील वृत्ती यामुळे त्यांची कथा मराठी कथेमध्ये मोलाची भर घालणारी आणि स्वत:चे एक स्थान निर्माण करणारी आहे. एकंदरीत ही कथा रसिकांना जीवनासंबंधीचे एक नवेच भान देते. किंबहुना हेच त्यांच्या कथालेखनाचे सामर्थ्य आहे