Rajyogini Ahilyabai Holkar - Aaple Samaj Sudharak By Vitthalrai Bhat
लोकमाता, शरणांग्ता, न्यायनिष्ठूर, लोक प्रशासक. अभयदात्री, दानशूर, धर्माभिमानी असूनही सर्वधर्मभाव सांभाळून आयुष्यभर निष्ठेने, केवळ परोपकारी वृत्तीने राज्य कारभार करून, स्वदु:ख बाजूला ठेऊन केवळ लोकोपरार्थ आयुष्य जगणार्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र हे प्रत्येक व्यक्तीने, महिलांनी, मुलांनी वाचावं असं आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर हे प्रात:स्मरणीय नाव! निरपेक्षपणे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी स्वत: व्रस्तस्त भूमिका स्वेच्छेने स्वीकारत स्वत:च्या इंदौर संस्थानाचा विकास केलाच. शिवाय संपूर्ण भारतात तीर्थक्षेत्रांचा विकास केला. लोकसेवेचा वारसा त्यांनी आधुनिक भारताला दिला. हा वारसा वाराणसीपासून कृष्णेच्या तीरावरच्या वाईपर्यंत आजही टिकून आहे. आयुष्यात येणारी दु:ख बाजूला करत
माणसाने पुढे कसं जायचं याचं मार्गदर्शन महाराणी, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रातून प्रत्येक ओळीतून जाणवतं. मनोविकास प्रकाशनचं हे पुस्तक म्हणजे त्या लोकमातेला त्रिवार प्रणाम!