RajaRamShastri Bhagwat nivarak Sahitya by Durga bhagavat
राजारामशास्त्री भागवत (जन्म- १८५१, मृत्यू- १९०८) हे गेल्या शतकातील विचारवंत व समाजसुधारक 'विविध ज्ञानविस्तार' या नावाजलेल्या मासिकात ते सतत तेहतीस वर्षे लिहित होते. त्या काळात त्यांच्या विचारांनी व लेखांनी वादळे उठवली होती. त्यांचे अनेक संशोधनात्मक लेख विविध ज्ञानविस्तारातच पडून राहिले. पुस्तकरूपाने ते लेख आज जवळ जवळ शंभर वर्षांनी प्रथमच संकलित होत आहेत. शास्त्रीबोवांच्या निवडक साहित्याचा सहा खंडांचा हा संच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात किती महत्त्वाचा आहे हे खालील व्यक्तींच्या उद्गारावरून कळून येईल.
डॉ.मुकुंदराव जयकरः राजारामशास्त्री भागवत म्हणजे संशोधनात निमग्न झालेला गाढा विद्वान ! दलितांचा दक्ष कैवारी!
डॉ. भीमराव आंबेडकरः राजारामशास्त्री भागवत आपले हितचिंतक आहेत याची अस्पृश्यांना जाणीव होती. त्यांचे सर्व लिखाण संकलित करून प्रसिद्ध झाले पाहिजे.
साने गुरुजीः जुन्याकडे नव्या दृष्टीने पाहणे व पुराणातील भाकडकथांचे अवगुंठन काढून त्यातील सत्य शोधणे हे राजारामशास्त्री भागवतांचे काम होते.
रँग्लर परांजपेः महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात शास्त्रीबोवांना अवश्य स्थान मिळेल.
गोविंदाग्रज (गडकरी): 'भागवतांची धराच हिंमत'
राजारामशास्त्री भागवतांनी दिलेला हा सांस्कृतिक
ठेवा पुढील सहा खंडात महाराष्ट्राला सादर करीत आहोत.
खंड १ : महाठ्यासंबंधाने चार उद्गार
खंड २ : विचारमाधुकरी- १
खंड ३ : विचारमाधुकरी-२ खंड
४ : लेखसंग्रह - १
खंड ५ : लेखसंग्रह- २ (या खंडात प्राकृत भाषेची 'विचिकित्सा' हे प्रसिद्ध पुस्तक समाविष्ट आहे)
खंड ६ : प्रस्तावनाखंड लेखिका- दुर्गा भागवत