Payal Books
Raghoba By Uday S Kulkarni, Vijay Bapaye राघोबा नारायणराव पेशव्याचा खून Narayanrao Peshwyacha Khoon
Couldn't load pickup availability
Raghoba By Uday S Kulkarni, Vijay Bapaye राघोबा : नारायणराव पेशव्याचा खून Narayanrao Peshwyacha Khoon
राघोबा दादा; मराठा इतिहासातले एक असे महत्वाचे व्यक्तिमत्व, ज्याची त्याच्या काळात विविध अंगे समोर येतात – पराक्रमी सेनानी व मराठा सत्ता अटकेपार नेणारा योद्धा, परंतु त्या जोडीला स्वभावाने चंचल, शीघ्रकोपी, शौकीन आणि विलासी. अशा प्रकारे तो इतिहासाच्या पटलावर अनेक रूपाने झळकून जातो. पण त्याची ओळख ज्या घटनेने आज ही स्मृतीपटलावर येते, ती नारायणराव पेशवा याची हत्या हीच आहे. या ग्रंथात प्रामुख्याने अनेक स्रोतातून हा वस्तुनिष्ठ इतिहास वाचकांसमोर आणला आहे. यातून मराठा सत्तेचे पुढे काय झाले याची वाचकाला चाहूल ही लागते. मराठा इतिहासातील एका दुदैवी पर्वाची व एकमेव राजकीय खुनाची ही सत्यकथा आहे. 'राघोबा' या पुस्तकामध्ये मध्ये २६ रंगीत चित्रे, ११ नकाशे, ६ परिशिष्ठे, वंशावळी, मुख्य पात्रांची ओळख, संदर्भ सूची, नावांची सूची, कालसूची, ३१६ पृष्ठे (३० प्राथमिक धरून), शेकडो मूळ पत्रे, अप्रकाशित साधने सकट , उदय स कुलकर्णी यांच्या मूळ इंग्रजी ग्रंथाची विजय बापये अनुवादित मराठी सत्यकथा आपल्यासमोर आणली आहे.

