PAYAL BOOKS
Radha (Part 2) By Samar राधा
Couldn't load pickup availability
Radha (Part 2) By Samar राधा
राधा कादंबरीच्या पहिल्या भागात राधा आणि श्रावणीचा संवाद वाचकांनी वाचला आणि अनेक वाचकांनी अगत्याने त्यांचे उत्तमोत्तम अभिप्राय पाठवले; पण पहिल्या भागात गोष्ट संपली नव्हती... राधेने श्रावणीला सांगितलेल्या प्रेमाच्या व्याख्येत प्रेमाचे नऊ पैलू नमूद केले होते. श्रावणीने त्याबद्दल बराच विचारही केला होता; पण तिच्या आयुष्यात ती या तत्त्वज्ञानानुसार आचरण करू शकली का? असा प्रश्न अनेक वाचकांच्या मनात होता. '... आणि ते कायम सुखी आणि आनंदीच राहिले' असा कथेचा शेवट होऊ शकत नाही, असं मलाही वाटत होतं. कारण आपलं आयुष्य ही अनेक चढ-उतार, अडचणी, अनिवार्यता आणि हतबलतेने युक्त असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण कथा असते. हेच उदाहरण पहा : श्रीकृष्ण आणि राधा यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम असलं, तरी त्यांना विरह सहन करावा लागलाच. राधेसारख्या दैवी स्त्रीच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आलं, तर श्रावणीसारखी सामान्य मुलगी सदैव चिंतामुक्त आणि आनंदी कशी राहू शकेल? या दुसऱ्या आणि अंतिम भागात तिच्या जीवनातील चढ-उतार वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

