PAYAL BOOKS
Raangoshti By Kiran Purandare (रानगोष्टी)
Couldn't load pickup availability
Raangoshti By Kiran Purandare (रानगोष्टी)
मोहाच्या झाडाच्या अतिशय तरल गोष्टीपासून पिटेझरीतल्या एकेक गोष्टी उलगडत जातात. त्यात मग चिमणी येते, बिबट्या येतो, अस्वल अन् अजगर येतं. झाडबेडूक व शृंगी घुबड येतं. सोबतच असंख्य पक्षी अन् रानभाज्याही.
पक्षी निरीक्षकाची डोळस, अभ्यासू दृष्टी अन् हिरव्यागर्द भवतालातले बारकावे तितक्याच संवेदनशीलपणे टिपण्याची असोशी यांचा एकमेळ म्हणजे पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरेंच्या मनस्वी लेखणीतून उतरलेल्या या साऱ्या रानगोष्टी... जागोजागी नोंदवलेली झाडापानांची, प्राणी-पक्ष्यांची स्थानिक, शास्त्रीय नावं वाचकाच्या संदर्भज्ञानात भर घालत राहतात. अर्थातच, पिटेझरीतल्या जंगलझाडीत दडलेल्या या रानगोष्टींमध्ये वाचक रमून जातो..

